महागाईच्या चुलीवरची धग मोदी सरकारला भस्मसात करणार- आनंद परांजपे*
ठाणे :- गॅस सिलिंडरच्या दरात केंद्र सरकारने प्रचंड दरवाढ केली आहे. या दरवाढीच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने शहराध्यक्ष आनंद परांजपे यांच्या मार्गदर्शनानुसार, विरोधी पक्षनेत्या प्रमिला केणी आणि कार्याध्यक्षा सुरेखा पाटील यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्यांनी चक्क चूल पेटवून त्यावर भाकर्या भाजल्या.
घरगुती वापराच्या गॅस सिलिंडरच्या किंमतीत बुधवारपासून (12 फेब्रुवारी) वाढ करण्यात आली आहे. एलपीजी गॅसच्या किंमतीत सलग सहाव्यांदा वाढ करण्यात आली आहे. दिल्ली आणि मुंबईमध्ये अनुक्रमे 144.5 आणि 145 रुपये प्रति सिलिंडरची दरवाढ करण्यात आली आहे. या दरवाढीचा राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी कार्यालयासमोरच अनोखे आंदोलन करीत जोरदार निषेध केला. ‘बहुत हुई महंगाई की वार, चले जाओ मोदी सरकार:’ मोदी सरकार हाय-हाय; मुर्दाबाद मुर्दाबाद नरेंद्र मोदी मुर्दाबाद; चुल्हा जलाओ- मोदी भगाओ” अशा घोषणा यावेळी कार्यकर्त्यांनी दिल्या. यावेळी महिला कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्तपणे चुल पेटवून भाकर्या भाजल्या.
प्रसारमाध्यमांशी बोलताना विरोधी पक्षनेत्या प्रमिला केणी यांनी,“ मोदी सरकाने घरगुरती गॅस सिलिंडरच्या दरात 145 रुपयांची वाढ केली आहे. महागाई कमी करण्याचे आश्वासन देऊन केंद्रात सत्तेवर आलेले हे सरकार केवळ श्रीमंतांचे सरकार आहे. गोरगरीब माणूस महागाईच्या ओझ्याखाली दबला आहे. तरीही, मोदी सरकार गॅस सिलिंडर या मूलभूत गरजेकडे लक्ष देत नाही. मोदी सरकारने केवळ प्रसिद्धीसाठी उज्ज्वल योजनेंतर्गत गॅस सिलिंडर देणार्या या मोदी सरकारची गरीबविरोधी नीती आता जनतेच्या समोर आली आहे. त्यामुळे आता देशातील मायभगिनीच मोदी आणि भाजपला सत्तेवरुन खाली खेचण्यासाठी उत्सुक झाल्या आहेत, असे सांगितले. तर, अच्छे दिनचे आश्वासन देत केंद्रात सत्तेवर आलेल्या मोदी सरकारने महागाईचा उच्चांक गाठला आहे. आधी रेशनिंग दुकानात रॉकेल मिळत होते. तेदेखील बंद करण्यात आले आहे. त्यामुळे आम्हा महिलांना गॅस सिलिंडरऐवजी चुलीवरच स्वयंपाक करण्याची वेळ आली आहे. त्यामुळे चुलीची ही धगच मोदी सरकारला भस्मसात करेल, अशी टीका यावेळी राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या ठाणे शहर कार्याध्यक्षा सुरेखा पाटील यांनी केली.
या आंदोलनामध्ये युवती अध्यक्षा प्रियांका सोनार, महाराष्ट्र प्रदेश सचिव शशिकला पुजारी, महाराष्ट्र प्रेदश सचिव ज्योती निंबरंगी, विधानसभा अध्यक्ष फुलबानो पटेल, माधुरी सोनार, कार्यकर्तया लिला ताई भोईर, स्मिता पारकर, अनिता मोटे, प्रदेश सचिव कांता गजमल, वंदना हुंडारे, वंदना लांडगे, भानुमती पाटील, रचना वैद्य, पुजा जाधव, मंजू येरुणकर, अपर्णा पाटील, नलिनी सोनावणे, आशा राणे, लक्ष्मी पवार, मंगल कर्डिले, सुजाता गायकवाड, संगिता शेळके, पुजा खान, गायत्री आर्यमाने, लता सुर्यवंशी, झिबाईरा चौधरी, शैला पवार, सुजाता घाग, मनिषा भाबड, वनिता भोर. जिल्हा सरचिटणीस श्री प्रभाकर सावंत, विधानसभा अध्यक्ष नितीन पाटील, विधानसभा कार्याध्यक्ष महेंद पवार, ब्लॉक अध्यक्ष निलेश कदम, समिर पेंढारे, तुळशीराम म्हात्रे, विशाल खामकर, रत्नेश दुबे, निलेश फडतरे, शहर कार्यकारीणी दिलिप नाईक. अजित सावंत, वार्ड अध्यक्ष सुमित गुप्ता, साई प्रभु, दिनेश दळवी, विेवेक गोडबोले, किशोर चव्हाण, अनिल वजले, शिवा यादव. फिरोज पठाण, अखिलेश मिश्रा, दिनेश सोनकांबळे, युवक अध्यक्ष मोहसिन शेख, कार्याध्यक्ष संदेश पाटील, विद्यार्धी अध्यक्ष प्रफुल्ल कांबळे, सामाजिक न्याय विभाग अध्यक्ष कैलास हावळे, हॉकर्स सेल अध्यक्ष सचिन पंधरे, लिगल सेल अध्यक्ष विनोद उतेकर, युवक विधानसभा अध्यक्ष दिपक पाटील, उपाध्यक्ष शहर समिर नेटके, संकेत नारणे, ब्लॉक अध्यक्ष संदिप पवार, वार्ड अध्यक्ष कृणाल भोईर, वागळे ब्लॉक अध्यक्ष रोहित भंडारी, वागळे ब्लॉक उपाध्यक्ष निलेश जाधव शहर कार्यकारिणी, त्रिलोकी कनोजिया, कळवा विभाग अध्यक्ष आकाश पाटील, सदस्य सुजित भोळे आदी कार्यकर्ते सहभागी झाले होते.
ठाण्यात राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्यांनी थापल्या चुलीवर भाकर्या