ठाणे - जीपी पारसिक बँक आयोजित आंतरबँक क्रिकेट स्पर्धा नुकतीच भुमिपुत्र मैदान, दत्तवाडी, स्वामी समर्थ मठाजवळ, कळवा, ठाणे येथे संपन्न झाली. आंतरबँक क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन बँकेचे ज्येष्ठ संचालक व माजी अध्यक्ष जयराम पाटील यांनी खेळपट्टीची पूजा करुन श्रीफळ वाढवून केली. याप्रसंगी बँकेचे अध्यक्ष रणजीत पाटील, मनोज गडकरी (चीफ इन्फोरमेशन अधिकारी), | भारत म्हात्रे (अध्यक्ष - सहकारमूर्ती | गोपीनाथदादा पाटील फाऊंडेशन), राजेंद्र मोरे, महेश तिवारी, यशवंत नाना मते | (जनसंपर्क अधिकारी), उद्घाटनाचा सामना खेळणारे अपना सह बँकेचे व | चेंबर नागरिक सह. बँकेचे खेळाडू | उपस्थित होते. स्पर्धेत बलाढ्य असा | रणजी खेळाडूंचा भरणा असलेल्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, मुंबईचा संघ, सारस्वत को.ऑप.बँक; जीपी पारसिक बँक; अभ्युदय को.ऑप.बँक; वसई विकास को.ऑप.बँक; टी.जे. एस.बी.सह. बंक; चेंबूर नागरिक सह. बँक; एन.के.जी.एस.बी. को.ऑप.बँक; अपना सह.बँक: कल्याण जनता सह. बँक; अंबरनाथ जयहिंद को.ऑप.बँक; डि.एन.एस.बी. सह. बँक; हिंदुस्थान को.ऑप.बँक; ठाणे भारत सह. बँक; बॅसिन कॅथॉलिक को.ऑप.बँक; इत्यादी १६ नामवंत बँकांच्या बलाढ्य संघांनी भाग घेतला. जीपी पारसिक बँकेने चेंबूर नागरिक सह. बँकेचा पराभव करुन, तर वसई विकास सह. बँकेने सारस्वत को.ऑप.बँकेचा पराभव करुन अंतिम फेरी गाठली.
आंतर बँक क्रीडा स्पर्धा उत्साहात संपन्न ठाणे - जीपी पारसिक बँक