बांधकामासाठी खोदकाम करताना आढळला सोने-चांदीच्या शिक्क्यांचा हंडा

 


बांधकामासाठी खोदकाम करताना आढळला सोने-चांदीच्या शिक्क्यांचा हंडा.
उत्तर प्रदेशमध्ये एका नवीन इमारतीचे बांधकाम करण्यासाठी जुने घर पाडले असता सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. नवीन बांधकामासाठी जमिनीचे खोदकाम केल्यानंतर या खोदकामात सोने-चांदीचे शिक्के असलेला हंडा मिळाला आहे. याठिकाणी काम करणारे बांधकाम मजूर हा हंडा पाहून आश्चर्यचकित झाले. याबाबत, संबंधित जागेच्या मालकाला कळविताच मालकांनाही आनंद झाला. मात्र, या हंड्यावरुन मालक आणि मजूर यांमध्ये वाद झाला.उत्तर प्रदेशच्या सितापूरमधील संदाना परिसरात ही आश्चर्यकारक घडना उघडकीस आली आहे. खोदकाम करताना मिळालेल्या हंड्यातील मौल्यवान वस्तुंच्या वाटपावरुन मालक आणि मजूरांमध्ये वाद झाला. त्यानंतर, याबाबत पोलिसांना माहिती देण्यात आली. त्यावेळी, पोलीस अधीक्षक एल.आर.कुमार यांनी संबंधित घटनेबद्दल सांगताना, भारतपूर मजना कौरना येथे मंगळवारी खोदकाम करताना काही शिक्के आणिमौल्यवान वस्तू मिळाल्याचे सांगितले. तसेच,पोलिसांनीही संपत्ती ताब्यात घेतली असून खोदकाम करताना मिळालेल्या सर्व वस्तू पोलिसांकडे सुपूर्द केल्या आहेत की नाही, याची चौकशी सुरू असल्याचेही कुमार यांनी सांगितले.पोलिसांनी याप्रकरणी गावकरी आणि बांधकाम मजूरांचे जबाब नोंद करून घेतले आहेत. तसेच, पोलिसांनी आत्तापर्यंत 21 शिक्के जप्त करुन घेतले आहेत. त्यापैकी, 8 शिक्के खोदकाम करतानाच ताब्यात घेतले होते. तर, 13 शिक्के शुक्रवारी जप्त केले आहेत. मात्र, जर अजून संपत्ती लपवून ठेवली असल्यास संबंधितांवर कारवाई करण्यात येईल, असेही पोलिसांनी म्हटले आहे.


Popular posts
नाशिक जिल्हापोलिस अधीक्षक सचिन पाटील यांनी केले चिमुकल्या गार्गीची भेट घेऊन कौतुक.
Image
माझा सभासद माझी जबाबदारी.
Image
ठाण्यात उद्यापासून जेष्ठ नागरिकांसाठी 'ड्राईव्ह ईन' लसीकरण सुविधा सुरू फक्त नोंदणीकृत जेष्ठ नागरिकांनाच दुसरा डोस घेता येणार.
Image
छ.शिवाजी महाराज चौक कळवा ते खोपट, तीनहात नाका मार्गे मुलुंड चेकनाका* ठाणे परिवहन बस फेऱ्यात वाढ- विजय देसाई
Image
*रेल्वेमार्गावरुन ऑक्सिजन टँकर वाहतुकीचा पहिलाच प्रयोग* *‘ऑक्सिजन एक्स्प्रेस’ विशाखापट्टणमला रवाना* _पाच दिवसात रेल्वेने येणार ११० टन द्रवरूप प्राणवायू_*
Image