नवी मुंबईतील रेल्वे स्थानकात लवकरच सरकते जिने व लिफ्ट उभे करण्यासाठी सल्लागाराची नियुक्ती सिडकोकडून होणार - खासदार राजन विचारे यांनी आयोजित केलेल्या सिडको व रेल्वे बैठकीत निर्णय

ठाणे :- नरेंद्र कसबे.


ठाणे:- गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित असलेला सिडको व रेल्वे हस्तांतरण विषय मार्गी लावण्यासाठी खासदार राजन विचारे यांनी सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक यांच्या दालनात रेल्वे च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या समवेत बैठक आयोजित केली होती. या बैठकीला सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्रा, रेल्वे प्रबंधक शलभ गोयल, ए डी आर एम आशुतोष गुप्ता, सिडको रेल्वे प्रकल्पाचे मुख्य अभियंता चौटालीया, अधीक्षक अभियंता मिसाळ, कार्यकारी अभियंता जयस्वाल इत्यादी उपस्थित होते.


नवी मुंबईतील रेल्वे स्थानकात होणाऱ्या सोयी सुविधां अभावी रेल्वे प्रवाशांचे होणारे हाल लक्षात घेता वारंवार सिडको व रेल्वे प्रशासनाकडे पत्रव्यवहार करून कामे मार्गी लागत नसल्याने खासदार राजन विचारे यांनी सिडकोच्या दालनात बैठकीचे आयोजन करून रेल्वे व सिडको यांच्यातील काम कोणी करायचे या विषयावर चालढकल करणाऱ्या अधिकाऱ्यांमधील तिढा सोडविला. त्यामध्ये सिडकोने विकसित केलेले अवाढव्य स्थानके रेल्वेला देखभाल दुरुस्तीसाठी शक्य नसल्याने याची देखभाल दुरुस्ती सिडकोने करावी असे रेल्वेकडून स्पष्ट करण्यात आले. तसेच यापूर्वी झालेल्या सिडको 67% व रेल्वे 33% या करारानुसार कामासाठी लागलेला खर्च रेल्वे सिडकोकडे भरीत आहे. दुरुस्तीसाठी लागणारा खर्च रेल्वेने सिडकोकडे भरावा असे ठरविण्यात आले.


तसेच खासदार राजन विचारे यांनी आपल्या मतदारसंघात येत असलेल्या रेल्वे स्थानकातील प्रलंबित कामांचा आढावा घेत असताना ऐरोली स्थानकात वाढत्या प्रवासामुळे प्रवाशांना स्थानकाबाहेर पडताना  होत असलेला त्रास लक्षात घेता या रिक्षा स्टॅण्ड जवळील असलेल्या रिक्षा लेन वाढून त्याठिकाणी बॅरीकेट लावून देण्याची मागणी सिडकोकडे करण्यात आली. त्याचबरोबर रबाळे रेल्वे स्थानकात पश्चिम बाजू बनविण्यात आलेल्या तिकीट खिडकी ची झालेली दुरावस्था त्यांच्या निदर्शनास आणून दिली खिडकीचे तातडीने दुरुस्ती करून ही तिकीट खिडकी तात्काळ सुरू करावी अशी मागणी खासदार राजन विचारे यांनी केली तसेच ऐरोली रबाळे व घणसोली या स्थानकात स्टेशन मास्तर हे पद तातडीने भरून याठिकाणी उपलब्ध करुन द्यावा अशी मागणी रेल्वेकडे करण्यात आली. त्यानंतर बेलापूर येथील आग्रोळी स्मशानभूमी येथे सुरु असलेल्या पादचारी पुलाचे काम गेल्या सहा महिन्यापासून बंद असल्याची विचारणा केली असता हे काम रेल्वेच्या एमआरव्हीसीच्या विभागामार्फत सुरू असल्याचे निदर्शनास आले. त्यांच्याशी संपर्क करून हे काम तातडीने पूर्ण करून घेण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिले. तसेच तुर्भे व बेलापूर येथील उभारण्यात आलेल्या पादचारी पुलाचा उपयोग संरक्षण भिंत न बांधल्याने नागरिक करीत नाही. यासाठी त्या ठिकाणी संरक्षक भिंतीचे काम तातडीने करून घेण्याचे आदेश रेल्वे प्रशासनाला दिले.


खासदार राजन विचारे यांनी सर्व रेल्वे स्थानकातच्या होणाऱ्या साफसफाई करणाऱ्या ठेकेदारावर व त्यावर नियंत्रण करणाऱ्या अधिकाऱ्यांवर नाराजी व्यक्त केली. खा  विचारे यांनी ऐरोली रेल्वे स्थानकाच्या आवारात असलेल्या पार्किंगच्या जागेवर कंपनीच्या बसेस उभ्या राहात असल्याने रेल्वे प्रवाशांच्या गाड्या उभ्या करण्याकरिता जागा उपलब्ध होत नाही. यामध्ये सिडकोचे नुकसानच होत आहे त्यामुळे सर्व रेल्वेस्थानकातील पार्किंग स्थळ विकसित करून उत्पन्न अधिक असे मिळवता येईल यावर भर द्या उदाहरण देताना ठाणे रेल्वे स्थानकातील पार्किंग ने रेल्वेला सर्वाधिक उत्पन्न मिळवून दिले आहे.


सर्व रेल्वेस्थानकातील जाहिराती फलक यामधून उत्पन्न कसे वाढविता येईल यावरही भर देण्याचे खासदार राजन विचारे यांनी अधिकाऱ्यांना सांगितले.


सर्व रेल्वे स्थानकात आयआरसीटीसी मार्फत बसविण्यात आलेल्या आरो प्लांट सारखे शुद्ध पाणी नवी मुंबईच्या सर्व रेल्वे स्थानकात सिडकोने पी पी पीच्या माध्यमातून सुरु करा अशी मागणी खा विचारे यांनी केली.


सीवूड रेल्वे स्थानकातील अपूर्ण कामे एल अँड टी मार्फत तातडीने पूर्ण करून घ्या तसेच सर्व रेल्वे स्थानकात दिव्यांगांसाठी रॅम आणि लिफ्ट किंवा सरकते जिने कसे बसविता येतील त्याचे नियोजन करा यावर सिडकोने या सर्व कामांसाठी सल्लागाराची नियुक्ती करून कामे पूर्ण करून देण्याची आश्वासने खासदार राजन विचारे यांना सिडकोने दिले


Popular posts
नाशिक जिल्हापोलिस अधीक्षक सचिन पाटील यांनी केले चिमुकल्या गार्गीची भेट घेऊन कौतुक.
Image
माझा सभासद माझी जबाबदारी.
Image
ठाण्यात उद्यापासून जेष्ठ नागरिकांसाठी 'ड्राईव्ह ईन' लसीकरण सुविधा सुरू फक्त नोंदणीकृत जेष्ठ नागरिकांनाच दुसरा डोस घेता येणार.
Image
छ.शिवाजी महाराज चौक कळवा ते खोपट, तीनहात नाका मार्गे मुलुंड चेकनाका* ठाणे परिवहन बस फेऱ्यात वाढ- विजय देसाई
Image
*रेल्वेमार्गावरुन ऑक्सिजन टँकर वाहतुकीचा पहिलाच प्रयोग* *‘ऑक्सिजन एक्स्प्रेस’ विशाखापट्टणमला रवाना* _पाच दिवसात रेल्वेने येणार ११० टन द्रवरूप प्राणवायू_*
Image