तुकोबारायांचा डोंगर वाचविण्यासाठी छातीची ढाल करणार्या या महाराजांना सपोर्ट कराल का ?*

 


सध्या महाराष्ट्रात इंदूरीकर महाराज आणि तृप्ती देसाई यांच्यातील वादाचा तमाशा जोरदार रंगला आहे. इंदूरीकर महाराजांच्या पाठबऴासाठी अनेक राजकीय नेते, पक्ष आणि सांप्रदायतील लोक "आय सपोर्ट इंंदूरीकर !" म्हणून पुढे येत आहेत. सोशल माध्यमात शड्डू ठोकत आहेत. पण असे एक किर्तनकार महाराष्ट्रात आहेत की त्यांना या पाठबऴाची नितांत गरज आहे. त्यांनी हाती घेतलेले कामही तितकेच मोलाचे आहे. सदर महाराजांना खाण माफियांनी बेदम मारून गोंदीयाच्या जंगलात मेला म्हणून टाकून दिले होते. त्यांच्यावर अनेक जीवघेणे हल्ले केले आहेत. ते भामचंद्र डोंगरात हनूमान मंदीर बांधून त्यात रहात होते. ते मंदीर या हरामखोरांनी आतल्या कागदपत्रासह आणि गाथेसह पेटवले. तब्बल चौदा वर्षे या महाराजांचा एकाकी संघर्ष सुरू आहे.


     या महाराजांचे नाव मधूसुदन पाटील असे आहे. महाराजांचा इथल्या व्यवस्थेशी जबरदस्त संघर्ष सुरू आहे पण तरीही काही अपवाद सोडले तर त्यांच्यामागे कुणी सपोर्ट द्यायला उभे राहिले नाही. मातृभूमी दक्षता समितीचा एक खंदा मुस्लिम कार्यकर्ता मुबारक शेख हा एकटाच पठ्ठ्या महाराजांच्या लढ्याला पाठबऴ द्यायला समोर आला. त्याने एकट्यानेच या महाराजांना पाठबऴ दिले. बाकी कुठली वारकरी संघटना, कुठले सांप्रदायवाले किंवा धर्माचे ठेकेदार यासाठी पुढे आले नाहीत. या महाराजांनी तब्बल दोन वर्षे म्हणजे २००५ ते २००७ या काऴात भामचंद्र डोंगर परिसरात प्रवचनाच्या माध्यमातून प्रबोधन केले. लोकांना तुकोबांच्या तपोभूमीचे महत्व पटवून सांगितले. लोक सांगूनही ऐकत नाहीत. डोंगर सुरूंग लावून उडवला जातो आहे म्हणून त्यांनी लोकशाहीच्या मार्गाने लढा द्यायला सुरूवात केली. आंदोलन केले,  उपोषण केले पण प्रशासन ऐकायला तयार नव्हते. अखेर जिल्हाधिकारी कार्यालय पेटवण्याचा इशारा दिल्यावर  थोडीशी यंत्रणा हलली. सदरची तपोभूमी संरक्षित करण्याची अधिसुचना काढली. तोवर बर्यापैकी भामचंद्राचे जेसीबी, पोकलँड लावून लचके तोडले होते. दररोज तपोभूमी उध्वस्त केली जात होती. मोठमोठ्या राजकीय नेत्यांच्या कंपन्या इथे भामचंद्राला सुरूंग लावत होत्या. डोंगर फोडत होत्या. भामचंद्र तुकोबारायांची साधनाभूमी आहेच पण या डोंगरात बौध्द लेणीही आहेत तसेच जैन धर्मीय मंदीरही आहे. म्हणजे या एकाच तपोभूमीत भारताच्या विविधतेतली एकता सामावलेली आहे. अशा पावन भूमीला संरक्षित करणे, तिला राष्ट्रीय वारसा म्हणून जतन करणे गरजेचे असताना ती फोडली जात आहे. ही खेदाची आणि लाजिरवाणी बाब आहे. या महाराजांना व त्यांच्या लढ्याला खर्या अर्थाने पाठबऴाची गरज आहे. ज्या पध्दतीने इंदूरीकर महाराजांच्या पाठीशी पाठबऴ द्यायला विविध मंडऴी उभ्या राहिल्या आहेत, कुणी मिरवणूका काढल्या, कुणी सोशल मिडीयात मोहीम चालवली अशीच मोहीम या महाराजांच्या लढ्याला पाठबऴ म्हणून चालवली जाईल का ? हा प्रश्न आहे. मधूसुदन पाटील महाराज सांगतात की या डोंगराला वाचविण्यासाठी ते इंदूरीकर महाराजांनाही भेटायला गेले होते. त्यांच्याकडेही हा विषय मांडला पण त्यांनीही मधूसुदन पाटलांना वाटाण्याच्या अक्षदा लावल्या. पाठबऴ दिलेच नाही किंवा त्याबाबत चकार शब्दही काढला नाही. मधूसुदन पाटील महाराजांचा लढा ताकदीने लढणे गरजेचे आहे. तो लढा समस्त महाराष्ट्राच्या आणि वारकरी सांप्रदायाच्या अस्मितेचा आहे. कारण भामचंद्र डोंगर हा प्रत्येक सामान्यातल्या सामान्य माणसाच्या उध्दाराचे प्रतिक आहे. व्यक्तीत्वाकडून दिव्यात्वाकडे होणार्या प्रवासाचा तो साक्षीदार आहे. तुकोबारायांसारखा एक साधा संसारी माणूस ज्या उंचीला जातो त्या उंचीचा तो डोंगर जीवंत पुरावा आहे. तुका अणू रेणूया थोकडा । तुका आकाशा एवढा ।। हा जो तुकोबारायांचा प्रवास आहे, अनुभव आहे तो या भामचंद्राने पाहिला आहे, स्वत: अनुभवला आहे. तोच भामचंद्र वाचविण्यासाठी जीव धोक्यात घालून लढणार्या मधूसुदन महाराजांना पाठबऴाची गरज आहे. त्यांचा लढा या सर्वांनी लढण्याची गरज आहे.
      
     ज्या ठिकाणी जगदगुरू संत तुकाराम महाराज यांनी साधना केली. त्यांना जिथे द्नानप्राप्ती झाली तो भामचंद्र आणि भंडारा डोंगर खाण माफियांनी सुरूंग लावून फोडायला सुरूवात केली आहे. या डोंगरांचा काही भाग फोडला गेला आहे. संत तुकोबारायांच्या पदस्पर्शाने व साधनेने पावन झालेली ही भूमी खरेतर राष्ट्रीय वारसा म्हणून जतन करावी इतकी महान आहे. अशा भूमीला सुरूंग लावून, स्फोटाने तिच्या चिंधड्या उडवत पैसे छापणार्या औलादी इथे कार्यरत आहेत. हे काम बिनबोभाटपणे चालते आहे. त्याला कोणीच विरोध करत नाही हे भयंकर आहे. भामचंद्र आरक्षित करावा, त्या तपोभूमीचे यथोचित स्मारक व्हावे, तुकारामांच्या साधना भूमीचे संरक्षण व्हावे या साठी मधूसुदन पाटील महाराजांना कुणी पाठबऴ देणार का ?


Popular posts
नाशिक जिल्हापोलिस अधीक्षक सचिन पाटील यांनी केले चिमुकल्या गार्गीची भेट घेऊन कौतुक.
Image
माझा सभासद माझी जबाबदारी.
Image
ठाण्यात उद्यापासून जेष्ठ नागरिकांसाठी 'ड्राईव्ह ईन' लसीकरण सुविधा सुरू फक्त नोंदणीकृत जेष्ठ नागरिकांनाच दुसरा डोस घेता येणार.
Image
छ.शिवाजी महाराज चौक कळवा ते खोपट, तीनहात नाका मार्गे मुलुंड चेकनाका* ठाणे परिवहन बस फेऱ्यात वाढ- विजय देसाई
Image
*रेल्वेमार्गावरुन ऑक्सिजन टँकर वाहतुकीचा पहिलाच प्रयोग* *‘ऑक्सिजन एक्स्प्रेस’ विशाखापट्टणमला रवाना* _पाच दिवसात रेल्वेने येणार ११० टन द्रवरूप प्राणवायू_*
Image