शिवजयंती निमित्ताने ठाण्यात शिवकालीन नाण्यांचे प्रदर्शन

 


ठाणे - महाराष्ट्राचे आराध्य दैवत शिवछत्रपती महाराज यांच्या जयंतीनिमित्त ठाण्यात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते कोपरी येथे ठाणे काँग्रेसच्यावतीने शिवकालीन वस्तूंचे प्रदर्शन भरवण्यात आले होते यामध्ये दुर्मिळ नाणी नोटा पोस्टर पोस्टाची तिकिटे हस्तलिखिते दुर्मिळ वस्तू तोफांचे गोळे शिवकालीन शस्त्रास्त्रे अशा विविध मौल्यवान वस्तू प्रदर्शनात ठेवण्यात आल्या होत्या. भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसच्या कोपरी ब्लॉकचे अध्यक्ष कृष्णा भुजबळ यांच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीप्रित्यर्थ ठाणे पुर्व आनंद सिनेमानजीक शिवतीर्थ ग्रुपच्या वतीने या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते.


        इतिहास जपण्याच्या प्रयत्नातून नागरिकांना इतिहासकालीन वस्तूंचे माहिती व्हावी यासाठी या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते ठाण्यातील अनेक इतिहासप्रेमींनी या प्रदर्शनाला भेट देऊन शिवकालीन वस्तूंचे माहिती घेतली तसेच प्रदर्शन भरवले बद्दल आयोजकांचे आभार मानले. नागरिकांनी देखील हे प्रदर्शन पाहण्यासाठी गर्दी केली होती.


        या प्रदर्शनात दुर्मिळ नाणी, नोटा, पोस्टाची तिकिटे, हस्तलिखिते, दुर्मिळ वस्तू, तांब्या-पितळ्याच्या व इतर धातुंच्या मूर्ती, परदेशी चलनातील नोटा व नाणी, टोकन, बॅच, शिवकालीन शस्त्रास्त्रे, अस्त्रे असा मौल्यवान खजिना, तितक्याच निगुतीने मांडलेले त्याचे प्रदर्शन, प्रत्येक स्टॉलवर त्याची माहिती देण्यास सरसावणारे इतिहासप्रेमी अभ्यासक, आजवर पुस्तकात अभ्यासलेले इतिहासकालीन नाणी, नोटांचे होत असलेले प्रत्यक्ष दर्शन यामुळे पाहायला मिळाले. यामध्ये सुमारे ५०० पुरातन नाण्यांचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाप्रसंगी करण्यात आलेल्या तुलेतील दुर्मिळ 'सुवर्णहोन'देखील प्रदर्शित करण्यात आला आहे.


कार्यक्रमाचा शुभारंभ करिता जिल्हाध्यक्ष  मनोज शिंदे यांनी शिवपुतळा पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले


Popular posts
नाशिक जिल्हापोलिस अधीक्षक सचिन पाटील यांनी केले चिमुकल्या गार्गीची भेट घेऊन कौतुक.
Image
माझा सभासद माझी जबाबदारी.
Image
ठाण्यात उद्यापासून जेष्ठ नागरिकांसाठी 'ड्राईव्ह ईन' लसीकरण सुविधा सुरू फक्त नोंदणीकृत जेष्ठ नागरिकांनाच दुसरा डोस घेता येणार.
Image
छ.शिवाजी महाराज चौक कळवा ते खोपट, तीनहात नाका मार्गे मुलुंड चेकनाका* ठाणे परिवहन बस फेऱ्यात वाढ- विजय देसाई
Image
*रेल्वेमार्गावरुन ऑक्सिजन टँकर वाहतुकीचा पहिलाच प्रयोग* *‘ऑक्सिजन एक्स्प्रेस’ विशाखापट्टणमला रवाना* _पाच दिवसात रेल्वेने येणार ११० टन द्रवरूप प्राणवायू_*
Image