🔔 *मंदीर /शाळा* 📖🖋
*मंदीराचे कळस गगनाला भिडले*
*शाळेचे बांधकाम देणगीवाचुन अडले*
*दुधाचा अभिषेक दगडाच्या देवाला*
*शालेय पोषण आहार नुसताच नावाला*
*देवाचा दरवाजा चांदीने मढला*
*शाळेचा दरवाजा पाण्याने सडला*
*मंदीरातील झुबंराला हि-या मोत्यांचे खडे*
*शाळेच्या भिंतीना पडु लागलेत तडे*
*मंदीरात जाऊन लोक पोथी पुराण वाचतात*
*शाळेच्या ग्रथांलयात ऊंदीर मामा नाचतात*
*मंदीराच्या दानपेटीत गुप्तदान करतात*
*शाळेच्या देणगीची पावतीच मागतात*
*दरवर्षाला देवाची भरवतात यात्रा*
*पालक मेळाव्यात फक्त पालक सतरा*
*पुज्या-यांच्या गळ्यात सोन्या चांदीचे हार*
*कंत्राटी शिक्षकांची होऊ लागली उपासमार*
*न खाणाऱ्या देवाला पंचपक्वनाचा घास*
*शाळेत खीचडी भाताचा अहो येईना वास*
*आता तुम्हीच सांगा कधी संपेल इथला अंधविश्वास*
*शिकले - सवरलेले तरुण- तरुणीच करु लागले आता उपवास*
😞🙏🏻 *नवीन पिढीला समर्पित* 🙏🏻😞