दिवा - दिवा येथे मातोश्री सकुल येथील लोटस व्हिला सोसायटीमध्ये मोठ्या उत्साहात हळदी कुंकुचा कार्यक्रम करण्यात आला. सलग २ दिवस चालणाऱ्या या कार्यक्रमात कमिटीचे अध्यक्ष मनोज खरे, सुंदरा मोरे, जाधव माने, मनिष मोरे, विशाल राणे, समिर मोरे, अतिष कदम, सावंत, चौगुले, कुणाल जाधव, विठ्ठल देसाई, सचिन जाधव, एकनाथ जाधव, चव्हाण जोरकर गुप्ता संजय शेट्टी यांनी कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडला. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून दिवा शहर प्रमुख रमाकांत मढवी उपशहरप्रमुख शैलेश पाटील, नगरसेवक दिपक जाधव, जगदीश भडारी, दिवा विभागप्रमुख चरणदास म्हात्रे, ज्ञानेश्वर बेडेकर, राजेश पुजारी, अविनाश बेडेकर याची उपस्थित लाभली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी समिर शिंदे, विशाल राणे, अतिश कदम, यांच्यासह प्रमिला देसाई, साक्षी पिंपळे, योगिता विचारे, दिपाली चौगुले, प्रगती डहाणुकर, संजीवनी जाधव, रंजना सावंत, शुभा शेट्टी, संगिता परब, स्वाती शिंदे, शशीकला खरे-जाधव, सोनाली राणे, आरती कदम आदींनी परिश्रम घेतले..
दिव्यातील लोटस् व्हिलामध्ये स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न