पुनर्जीवन सामाजिक संस्थेच्या वतीने अवयवदान जनजागृती महारॅली आणि अवयवदान नोंदणी कार्यक्रम
ठाणे :-
पुनर्जीवन सामाजिक संस्था आणि बाळगोपाळ मित्र मंडळाच्या वतीने मासुंदा तलाव परिसरात गुरुवार, दि. 13 फेब्रुवारी रोजी अवयवदान जनजागृती महारॅली काढण्यात येणार आहे तर 14 फेब्रुवारी रोजी अवयवदान नोंदणी अभियान मासुंदा तलाव परिसरात राबविण्यात येणार आहे.
सायंकाळी 4 वाजता प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत जनजागृती महारॅलीला प्रारंभ होणार आहे. ठाणे जिल्हा पालकमंत्री एकनाथ शिंदे, ठाणे जिल्हाधिकारी राजेंद्र नार्वेकर यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित राहणार आहेत. ठाणेकरांनी अवयवदान जनजागृती महारॅलीत सहभागी होऊन अवयवदानाविषयी जागृती मोहीमेत सहभागी व्हावे तसेच अवयवदान नोंदणीचा फॉर्म भरुन आपला सक्रिय सहभाग नोंदवावा असे आवाहन आयोजक विलास ढमाले यांनी केले आहे. अवयवदान मोहीम 14 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 ते 1 आणि सायंकाळी 5 ते 10 या वेळेत मासुंदा तलाव परिसरात करण्यात येणार आहे.