दिल्लीत पुन्हा 'आपʼले सरकार

संपूर्ण देशाचं लक्ष लागलेल्या दिल्ली विधानसभा निवडणुकीचं चित्र जवळपास स्पष्ट झालं आहे. सत्तेत असलेल्या आम आदमी पार्टीला स्पष्ट बहुमत देत दिल्लीकरांनी सत्तेवर बसण्याचा कौल दिल्याचे प्राथमिक कलांमधून दिसत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली लढणाऱ्या भाजपानं ही निवडणूक प्रचंड प्रतिष्ठेची केली होती. राष्ट्रावाद विरूद्ध विकास अशी एकंदरीत ही निवडणूक लढवली गेली. त्यात दिल्लीकरांनी विकासाला पाठिंबा दिलाआहे. त्यामुळे अरविंद केजरीवाल सलग तिसऱ्यांदा दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान होतील. यासर्वांमध्ये काँग्रेसची कामगिरी निराशाजनक राहिली आहे.