ठाणे शहराचा पाणी पुरवठा बंद राहणार
ठाणे : - ठाणे महानगरपालिकेच्या पिसे येथील अशुध्द जलशुध्दिकरण केंद्रात पाणी पुरवठा करणाऱ्या मुख्य जलवाहिनीवरील एनआरव्ही दुरुस्तीचे काम सुरु असल्याने शहराला होणारा पाणी पुरवठा आज दिनांक १७ फेब्रुवारी २०२० रोजी रात्रौ १२.०० वाजेपर्यंत बंद राहणार आहे.
पिसे येथील अशुध्द जलशुध्दिकरण केंद्रात पाणी पुरवठा करणाऱ्या मुख्य जलवाहिनीवरील एनआरव्ही दुरुस्तीचे काम सुरु असल्याने शहराला होणारा पाणी पुरवठा आज दिनांक १७ फेब्रुवारी २०२० रोजी रात्रौ १२.०० वाजेपर्यंत बंद राहणार आहे. यामध्ये घोडबंदर रोड, पातलीपाडा, पवार नगर, कोठारी कंपाऊंड, गांधीनगर, इंदिरानगर, श्रीनगर, लोकमान्यनगर, समतानगर, ऋतुपार्क, सिध्देश्वर, जेल, साकेत, उथळसर, रेतीबंदर, मुंब्रा - कोळीवाडा, शैलेशनगर, संजय नगर, कळव्याचा काही भाग, आझादनगर, डोंगरीपाडा इत्यादी ठिकाणचा पाणी पुरवठा बंद राहणार आहे.
यामुळे पाणी पुरवठा पूर्व पदावर येईपर्यंत पुढील एक ते दोन दिवस कमी दाबाने पाणी पुरवठा होणार असून, नागरिकांनी पाण्याचा योग्यतो वापर करुन पालिकेस सहकार्य करावे असे आवाहन पाणी पुरवठा विभागाने केले आहे.