कल्याण : कल्याण-डोंबिवली पालिका क्षेत्रात दररोज निर्माण होणाऱ्या २१६ दशलक्ष लिटर सांडपाण्यापैकी १६० दशलक्ष लिटर सांडपाणी कोणत्याही प्रक्रियेविनाच थेट खाडीत सोडले जात असल्याची गंभीर दखल महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने घेतली आहे. घनकचरा विल्हेवाट, सांडपाणी आणि मलनि:सारण प्रकल्प, अशा विविध विषयांवर प्रदुषण नियंत्रण मंडळाने महापालिकेला वारंवार नोटिसा बजावल्या आहेत. तसेच पर्यावरणाच्या विषयावरून हरित लवादानेही महापालिका प्रशासनाची कानउघाडणी केली आहे. डोंबिवली शहराची हवा सर्वाधित प्रदषित आहे. जल आणि हवा प्रदूषणामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला असतानाही पालिका प्रशासनाकडून कोणतीही ठोस उपाययोजना करण्यात येत नाही. उलट पालिकेकडूनच प्रदूषणात भर पाडण्यात येत असल्याचे माहिती अधिकाराअंतर्गत उघड झाले आहे. गणेश बाबर यांनी प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून माहिती मागवली होती. या माहिती अधिकारात विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तरामधून कल्याण-डोंबिवली पालिका हद्दीत पुरेशा प्रक्रियेविनाच मलपाणी थेट खाडीत सोडले जात असल्याची बाब समोर आली होतीत्याची दखल घेऊन महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कल्याण विभागाचे प्रादेशिक अधिकारी शंकर वाघमारे यांनी पालिका आयुक्त गोविंद बोडके यांना नोटीस बजावली आहे. कल्याणडोंबिवली पालिका हद्दीत दररोज २१६ दशलक्ष लिटर मलजल निर्माण होत असताना, त्यावर पर्ण क्षमतेने प्रक्रिय करण्यास प्रशासन अपयशी ठरले आहे
प्रक्रिय करण्यास प्रशासन अपयशी