क्युरे हॉस्पीटल व अर्पण फौंडेशनतर्फे महिलांसाठी आरोग्य तपासणी शिबीर संपन्न
ठाणे- क्युरे ह़ॉस्पीटल व अर्पण फौंडेशनतर्फे महिलांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन ब्रम्हांड येथे करण्यात आले होते. स्त्री रोग तज्ज्ञ डॉ. रेखा थोटे, डॉ. विश्वेश्वरी यांनी महिलांची तपासणी केली. अर्पण फौंडेशनच्या भावना डुंबरे यांनी या शिबिराचे आयोजन केले होते. गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर तसेच गर्भाशयाचा कॅन्सरपूर्व तपासणी यावेळी करण्यात आली.
क्युरे हॉस्पीटलचे मार्केटिंगचे उमेश कांबळे देखील यावेळी उपस्थित होते. १०० हून अधिक महिलांनी या शिबिराचा लाभ घेतला.