ठाणे :- “तुमचे आमचे नाते काय; जय जिजाऊ, जय शिवराय” अशा घोषणा देत ठाणे शहरात राष्ट्रवादी काँग्रेसने प्रचंड जल्लोषात छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी केली. राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालय आणि मासुंदा तलाव येथे शहराध्यक्ष आनंद परांजपे, राष्ट्रवादीचे प्रदेश चिटणीस तथा ज्येष्ठ नगरसेवक सुहास देसाई , महिला अध्यक्ष सौ. सुजाताताई घाग आणि महिला कार्याध्यक्षा सौ. सुरेखा ताई पाटील यांच्या हस्ते शिवरायांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला.
छत्रपती शिवाजी महाराज जयंती सोहळ्याचे ठाणे राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयामध्ये आयोजन करण्यात आले होते. यावेळी शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या अर्धकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. त्यानंतर सर्व कार्यकर्त्यांनी शहराध्यक्ष आनंद परांजपे यांच्या नेतृत्वाखाली मासुंदा तलाव येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुर्णाकृती पुतळ्याला अभिवादन केले.
राष्ट्रवादीने साजरी केली जल्लोषात शिवजयंती