ठाणे - भारतात जाती व्यवस्थेने पंच्यान्नव टक्के लोकांना देवळापासून स्मशानापर्यंत जाऊच दिले नाही, त्यांनी पुरावे द्यायचे कोठून? असा थेट प्रश करत सुधारित नागरिकत्व कायदा आणि राष्ट्रीय नोंदणीच्या नावाखाली देश तोडण्याचे षडयंतत्र मोदी-शहा आणि भागवत यांनी रचले आहे. हा कायदा मुस्लमांच्या विरोधात नाही तर हा कायदा संविधानाच्या विरोधात आहे. म्हणूनच संविधानिक मार्गाने आंदोलने करणाऱ्यांवर हल्ले केले जात आहेत. मात्र, कोणीही हिंसेला उत्तर हिंसेने देऊ नका, हा देश बुद्ध आणि गांधीजींचा आहे. त्यांनी फेकलेला दगड आपण झेल या; अन् त्या दगडानेच त्यांच्या विचारधारेची कबर बांधू या, असे आवाहन गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी केले. ठाणे शहरात कुल जमात तंजीम, ठाणे या संघटनेच्या पुढाकाराने एनआरसी आणि सीएएच्या विरोधात मूक मोर्चा काढण्यात आला होता. राबोडी येथून सुरु झालेला मोर्चा ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विसर्जीत करण्यात आला. त्यावेळी झालेल्या सभेत डॉ. जितेंद्र आव्हाड हे बोलत होते. या प्रसंगी निवृत्त न्यायाधीश बी. जी. कोळसे-पाटील, राष्ट्रवादीचे ठाणे शहराध्यक्ष आनंद परांजपे, राष्ट्रवादीचे | प्रदेश सरचिटणीस तथा राष्ट्रवादीचे | गटनेते नजीब मुल्ला, राष्ट्रवादीचे प्रदेश | चिटणीस सुहास देसाई, काँग्रेसचे | विक्रांत चव्हाण, रिपाइंचे सुनील खांबे, | वंचित बहुजन आघाडीचे संजय मिरगुडे | आदी उपस्थित होते. या मोर्चामध्ये सुमारे १० हजार लोक सहभागी झाले होते. संविधान बचाव महासभेला तिरंगी ध्वज घेऊन मोठ्या संख्येने मुसिम | बांधव, महिला सहभागी झाल्या होत्या. | केंद्र सरकारचा नागरिकत्व सुधारणा | आणि राष्ट्रीय नोंदणी कायदा मुलभूत | अधिकारावर गदा आणणारा असल्याने संविधानच धोक्यात आले आहे. त्यामळे | आता जात, भेद, धर्म विसरुन जयभिम | चा नारा देण्याचे आवाहन जितेंद्र आव्हाड यांनी केल्यानंतर जयभिमच्या घोषणांनी परिसर दणाणला.
मनुवादी विचारधारेची कबर आम्हीच बांधू-आव्हाड