पत्रकारांसाठी नुकतीच "वेब मीडिया,टीव्ही जनर्लिस्ट असोसिएशन,विधिमंडळ व मंत्रालय मुंबई ची स्थापना.
ठाणे :- नरेंद्र कसबे.
ठाणे :- मंत्रालय व विधिमंडळ मुबंई वेबमीडिया टीव्ही जर्नलिस्ट असोसिएशनच्या अध्यक्षपदी गर्जा महाराष्ट्र न्यूज चॅनलचे मुख्यसंपादक / चेअरमन अनिल महाजन यांची निवड.
संचालक सदस्य म्हणून यांची निवड.
इरफान अब्दुल रज्जाक शेख,गणेश संपत पुजारी,अभिजित बळवंत पाटील,अयाज अहमद मोहसिन,आनंद दिनानाथ शर्मा,माऊली राजभाऊ डांगे,नरेंद्र दामोदर कसबे,प्रमोद बळीराम दांडगव्हाण. ऑनलाईन मीडिया मध्ये काम करणाऱ्या पत्रकारांसाठी नुकतीच "वेब मीडिया,टीव्ही जनर्लिस्ट असोसिएशन,विधिमंडळ व मंत्रालय मुंबई"* ची मंत्रालयात व विधान भवन येथे स्थापना करण्यात आली असून यासाठी सन २००४ पासून पत्रकारिता क्षेत्रात अथक परिश्रम घेणारे निर्भीड पत्रकारिता करणारे अभ्यासु ज्येष्ठ पत्रकार अनिल महाजन यांची अध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे. या असोसिएशन मध्ये महाराष्ट्रातील मंत्रालयात व विधीमंडळ येथे नियमियत वृत्तसंकलन करणारे विविध जिल्ह्यातील ऑनलाईन मीडियात काम करणाऱ्या अधिकृत एकूण ०९ पत्रकारांचा संचालक सदस्य म्हणून समावेश करण्यात आला आहे. आता पर्यंत ऑनलाईन मीडियासाठी अधिकृत कुठलीही संघटना नसून जेष्ठ पत्रकार अनिल महाजन यांच्या नेतृत्वाखाली एक समिती तयार करण्यात आली होती. त्यामध्ये सर्वानुमते महाजन यांच्या नावाची निवड करण्यात आली आहे. अध्यक्षपदी निवड झाल्यावर अनिल महाजन यांचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे.
*संचालक सदस्य म्हणून खालील अधिकृत ९ वेब मीडियाचे मुख्य संपादक पत्रकार यांची नियुक्ती करण्यात आली आहे.*
*(०१)अनिल बाबुलाल महाजन :- गर्जा महाराष्ट्र न्युज.*( अध्यक्ष) *(०२)इरफान अब्दुल रज्जाक शेख :- रफ्तार न्युज.*(सदस्य संचालक)
*(०३)गणेश संपत पुजारी :- गर्जा महाराष्ट्र न्युज.*(सदस्य संचालक)
*(०४)अयाज अहमद मोहसिन दाद खाँ :- इंडिया ३६५ न्युज.*
*(०५)आनंद दिनानाथ शर्मा :- आपतक न्युज.*
*(०६)माऊली राजभाऊ डांगे :- विठाई न्युज.*
*(०७)अभिजित बळवंत पाटील :- आवाज मराठी न्युज.*
*(०८)नरेंद्र दामोदर कसबे :- कळवा टाइम्स व दैनिक ठाणे जीवन न्युज.*
*(०९)प्रमोद बळीराम दांडगव्हाण :- नाशिक न्युज.*
यावेळी मंत्रालय माहिती जनसंपर्क महासंचलनाय चे महासंचालक दिलीप पाढंरपट्टे व संचालक आंबेकर यांनी अनिल महाजन व इतर सदस्य यांचे अभिनंदन केले धर्मादाय आयुक्त यांनी नोंदणीकृत वेब मीडिया टीव्ही जर्नलिस्ट असोसिएशन विधिमंडळ व मंत्रालय या नावाचे अधिकृत सर्टिफिकेट दिले आहे. लवकरच मुख्यमंत्री मा.उद्धव ठाकरे साहेब यांच्या उपस्थित राज्यसरकारने वेब मीडियासाठी पॉलिसी तयार करावी ही मागणी आणि पत्रकार बांधवांच्या न्याय हक्काच्या मागण्यासाठी तसेच सर्व नवनियुक्त सदस्य यांचा एक अभिनंदन सोहळा कार्यक्रम मंत्रालय येथे लवकरच आयोजित करण्यात येणार असल्याचे महाजन यांनी सांगितले तसेच *मंत्रालय व विधानभवन येथील पत्रकारासह राज्यभरातील वेब मीडियाच्या ( पोर्टल) च्या संपादक व पत्रकार यांच्या पाठीशी भक्कम पणे ही असोसिएशन उभी राहील व अध्यक्ष म्हणून माझा सर्व पत्रकारांना पाठींबा राहील असे अनिल महाजन यांनी बोलतांना सांगितले.* यावेळी अनेक मंत्री व मंत्रालयातील अधिकारी यांनी दूरध्वनीवर संपर्क करून अनिल महाजन व सदस्य संचालक टीमचे अभिनंदन केले.